Dhruvi Patel : ध्रुवी पटेल बनली ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ची विजेती

ध्रुवी पटेल बनली ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ची विजेती
Dhruvi Patel – भारताची ध्रुवी पटेल हि अमेरिकेत कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टमचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आहे. ध्रुवी पटेल (dhruvi patel) ही ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ (miss India world wide 2024) ची विजेती बनली आहे. ती मूळची गुजरात येथील आहे. शिक्षणासाठी ती सध्या अमेरिकेत गेली आहे. या विजयमुळे तिला अत्यानंद झाला आहे. ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ ही भारताबाहेर सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय स्पर्धा आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर ध्रुवीने बॉलिवूड अभिनेत्री आणि युनिसेफची ॲम्बेसेडर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Read This : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील घेणार उद्योजकांची बैठक
दरम्यान न्यू जर्सीतील एडिसन, येथे मिस इंडिया वर्ल्डवाइड हि स्पर्धा पार पडली. स्पर्धेची विजेती घोषित झाल्यानंतर ध्रुवी पटेल हि आनंदी असून तिने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली कि, “मिस इंडिया वर्ल्डवाइडचा किताब जिंकणे हा एक अभूतपूर्व सन्मान आहे. हे मुकुटापेक्षा अधिक आहे. माझा वारसा, माझी मूल्ये आणि जागतिक स्तरावर इतरांना प्रेरणा देण्याची संधि यातून दर्शवली जाते” असं तिने म्हटले आहे.
तसेच ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ या स्पर्धेत अनेक स्पर्धक होत्या, मात्र त्या सर्वांना मागे टाकून ध्रुवीने विजेतेपदावर नाव कोरले. सुरीनामच्या लिसा अब्दोएलहकला ‘फर्स्ट रनर अप’ घोषित करण्यात आले, तर नेदरलँडच्या मालविका शर्माला ‘सेकंड रनर अप’ म्हणून घोषित करण्यात आले.
1 thought on “Dhruvi Patel : ध्रुवी पटेल बनली ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ची विजेती”