शेवगाव : सर्व धर्मगुरूंच्या उपस्थितीत शांती संदेश कार्यक्रम संपन्न !

येथील उम्मीद सोशल फाउंडेशनच्या वतीने मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालय येथे सर्व धर्मिय धर्मगुरु यांनी उपस्थित राहुन एकाच मंचा वरुन सर्वांना शांतीचा संदेश दिला.
उम्मीद सोशल फाउंडेशनच्यावतीने आयोजन
शेवगाव (प्रतिनिधी) – येथील उम्मीद सोशल फाउंडेशनच्या वतीने मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालय येथे सर्व धर्मिय धर्मगुरु यांनी उपस्थित राहुन एकाच मंचा वरुन सर्वांना शांतीचा संदेश दिला. सर्व प्रथम मा .भंते शाक्य पुत्र राहुल(उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा)यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सागितले कि सर्वांनी आपल्या धर्माचे पालन करुन दुस-या धर्माचा आदर ठेवला पाहीजे त्या नंतर ग्रंथी किशोरसिंग(गुरुनानक दरबार नेवासा) यानी ईश्वर एक आहे त्याचे नावे अनेक रूपाने घेतले जातात .
मुफ्ती अब्दुल रज्जाक (जमियत उलेमा मराठवाड़ा) ने आपल्या मनोगत व्यक्त करताना सागितले की भारत देश अशा संस्कृति चा देश आहे गंगे च्या पाण्याने आमचे हिंदू बांधव पवित्र स्नान करतात त्याच गंगेच्या पाण्याने मुस्लिम बांधव वजु करुन नमाज पठण करतात.
तसेच प्रमुख वक्ते शेख सुबान अली साहेब (अध्यक्ष दंगा मुक्त महाराष्ट्र अभियान)यांच्या हस्ते उचल फाउंडेशन शेवगांव च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. व प्रमुख वक्ते शेख सुभान अली यानी मानवता आणि शांती या विषया वर मार्गदर्शन केले मार्गदर्शन करताना त्यानी क़ुरान मध्ये ईश्वरांने सागितले हे पैगंबर आम्ही तुम्हाला समस्त मानव जाति साठी करुणा म्हणुन पाठवले करुणाचा अर्थ होतो शोषित पिडीत लोकांच दु: ख पाहुन ते दुःख कमी करण्याचा प्रयास करने या प्रेरणेला करुणा म्हणतात तो मुस्लिम नव्हे ज्याने स्वत पोट भरुन खावे व त्याचा शेजारी उपाशी रहावा. तर मुस्लिमांची नैतिक जबाबदारी आहे जगात कुणीच उपाशी न रहावे.
सर्व उपस्थित मान्यवरांचा उम्मीद सोशल फाउंडेशन शेवगांव च्या वतीने वॄक्ष व साने गुरुजी यांची लिखीत इस्लामीक संस्कृति हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. व शेवटी मा. आमदार चंद्रशेखर घुले पा. यांनी उपस्थित सर्व धर्मगुरुचा सत्कार करुन उम्मीद सोशल फाउंडेशनला शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.मफीज इनामदार सर यानी केले
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उम्मीद सोशल फाउंडेशन शेवगांव चे सहकारी अलताफभाई पठाण, शफिक पिंजारी,समीर शेख, जमीर शेख सर अस्लम शेख बबलु तांबोली, एजाज शेख फ़राज़ जागिरदार अनिस असिफ तांबोली आदींनी परिश्रम घेतले .आभार उम्मीद सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष वसीमभाई मुजावर यांनी व्यक्त केले . या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.