Farmer : शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये नुकसान भरपाई : कृषिमंत्री धनंजय मुंडे

शेतकर्यांना हेक्टरी ५ हजार रुपये नुकसान भरपाई : कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई – मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना (farmer) हेक्टरी 5 हजार प्रमाणे मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक पार काढली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना (farmer) मोठा दिलासा मिळणार आहे.
Read This : Dhruvi Patel : ध्रुवी पटेल बनली ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ची विजेती
दरम्यान याद्वारे सुमारे 91 लाख हेक्टरवरील 83 लाख शेतकऱ्यांना 4192 कोटी अनुदान वितरित केले जानार आहे. या अनुदानाचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केले जाणार असल्याचे कृषिमंत्री मुंडे यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यावर्षी सोयाबीनचे अधिक उत्पन्न अपेक्षित असून शासनाकडून नाफेड व एनसीसीएफ मार्फत सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी, असेही निर्देश आजच्या बैठकीत मुंडे यांनी संबंधीतांना दिले आहेत.
संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनाहि मिळणार मदत
तसेच विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी देखील आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्याचप्रकारे बांग्लादेशमध्ये महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या संत्र्याकरिता आयात शुल्काच्या 50% अनुदान देण्याकरिता शासन स्तरावरून त्वरित कार्यवाही करण्याचेही निर्देश देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.