zp school : मनीष सिसोदिया यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा इमारतीचे उदघाटन !

zp school : मनीष सिसोदिया यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा इमारतीचे उदघाटन !
मिरजगाव – कर्जत – जामखेड मतदार संघातील मिरजगावमध्ये बांधण्यात आलेल्या जि. प. शाळेच्या (zp school) इमारतीच्या सुमारे १० वर्गखोल्यांचे उदघाटन दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या हस्ते करण्यात आले. हि इमारत ब्रिटिशकालीन होती.
दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेच्या (zp school) १० वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच खा. वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून बांधण्यात येणाऱ्या ५ वर्गखोल्यांचं भूमिपूजन देखील करण्यात आले. यावेळी सिसोदिया म्हणाले कि, देशातील राजकीय परिस्थिती बदलत आहे. त्यानुसार सर्वाना बदलावे लागेल. तसेच विकसित देशासाठी शिक्षण खूप आवश्यक आहे. त्यामुळे देशाची प्रगती होते.
तसेच यावेळी प्रा. नितेश कराळे (मास्तर) यांनी देखील सरकारच्या कामकाजाचा चांगलाच समाचार घेतला. तसेच यावेळी राज्यात बदल आवश्यक असल्याचे म्हटले. आमदार रोहित पवार यांनी देखील राज्यातील सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त केली. आणि या विधानसभेत राज्यात सत्तांतर हे नक्की होईल असे देखील म्हटले आहे.