मनोज जरांगे पाटील यांची ताब्यात खालावली, मराठा समाज अंतरवली सराटीकडे ….

मनोज जरांगे पाटील यांची ताब्यात खालावली, मराठा समाज अंतरवली सराटीकडे ....
Jarange Patil – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आज मनोज जरांगे पाटील यांची तब्येत प्रचंड खालवली आहे. शरीरातील साखर कमी झाल्याने त्यांना थकवा जाणवत असून जिल्हा आरोग्य अधिकारी वाघमारे यांच्या वैद्यकीय पथकाने आज जरांगे यांची तपासणी केली. मनोज जरांगे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उपचार घेण्याची विनंती केली आहे. मात्र मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
जरांगे पाटील त्यांनी उपोषण सुरु करून चार दिवस झाले आहेत मात्र आज त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. वारंवार उपोषण करत असल्यामुळे जरांगे यांच्या शरीरात त्राण राहिलं नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात आहे. जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत, परंतु जरांगे उपोषणावर ठाम आहेत .दरम्यान राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा समाज त्यांच्या भेटीसाठी येत आहे. काल राजरत्न आंबेडकर यांनी उपो०शनस्थळी भेट देऊन मागण्या मान्य कराव्यात यासाठी सरकारला इशारा दिला आहे.
गेम करू नका
माझा शुगर कमी होत होता. कमी होणारा शुगर वाढला कसा? असा सवाल करतानाच सरकारचं ऐकून माझा गेम करू नका, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जरांगे पाटील यांच्या मागण्या
मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी राज्यसरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा हे कुणबीच आहेत आणि त्यामुळे हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला कुणबी दाखले देत आरक्षण द्यावे. मराठा आंदोलना दरम्यान दाखल झालेले गुन्हे परत घ्यावे या प्रमुख मांगण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे.