Share Market : शेअर बाजार उच्चांकावर, सेन्सेक्स 84500 च्या वर, निफ्टीतही वाढ!

Share Market : शेअर बाजार उच्चांकावर, सेन्सेक्स 84500 च्या वर, निफ्टीतही वाढ!
share market : शेअर बाजाराने आज, गुरुवार दि. 26 सप्टेंबर रोजी एक नवा विक्रम रचला आहे. निफ्टी 50 निर्देशांक 26,000 अंकांच्या वर, 26,005 अंकांवर उघडला, तर सेन्सेक्स 85,000 ची पातळी ओलांडून 85,167 अंकांवर उघडला. काही काळानंतर, सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी सलग सहाव्या सत्रात नवीन सर्वकालीन उच्च पातळी गाठली आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांचा उत्साह वाढल्याने बाजारात तेजी पाहायला मिळाली.
दरम्यान सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्स 85,433.31 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे आणि निफ्टी 26,075.20 च्या सर्वकालीन उच्च पातळीवर पोहोचला आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये विक्रमी वाढ
आजच्या व्यवहाराची सुरुवात थोडी मंदावली होती, परंतु शेवटच्या अर्ध्या तासात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये 150 अंकांची वाढ होऊन 85,322.84 वर पोहोचला, तर निफ्टी 43.20 अंकांनी वाढून 26,047.35 वर पोहोचला. सकाळी 10:10 च्या सुमारास, सेन्सेक्स 247.00 अंकांच्या (0.29%) वाढीसह 26,072.80 च्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 68.65 अंकांनी (0.26%) वर होता.