Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, तुरुंगवासाची शिक्षा

Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, तुरुंगवासाची शिक्षा
मुंबई – शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) हे अब्रुनुकसानीच्या खटल्यात माझगाव सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. त्यांना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या (medha kirit somayya) यांनी संजय राऊत (sanjay raut) यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा हा खटला दाखल केला होता.
माझगाव कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवताना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली होती. मागच्या काही महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी सुरु होती. त्याचा आज सत्रन्यायालयाने निकाल दिला.
manoj jarange : मनोज जरांगे यांचे नवव्या दिवशी उपोषण स्थगित; सरकारला इशारा
ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर मोर्चा; …तोपर्यंत आंदोलन सुरूच !
दरम्यान खासदार संजय राऊत हे या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार कि नाही हे लवकरच कळेल. राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमयय्या यांच्यावर सार्वजनिक प्रसाधनगृहाच बांधकाम आणि देखभालीच्या कामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. ते हे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असल्याचा देखील आरोप केला होता. तेव्हा राऊत यांचे हे आरोप तथ्यहीन आणि बदनामीकारक आहेत, असे मेधा सोमय्या यांनी म्हटले होते.
तसेच राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी त्यांनी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भादंवि कलम 503, 506 आणि 509 अंतर्गत ही तक्रार दाखल केली होती.
… हे अपेक्षितच हेते.. मी कोणताही गुन्हा केलेला नाही : खा. संजय राऊत
ज्या देशात मुख्य न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीत मोदक खायला जातात, तिथे भ्रष्टाचाराविरोधात, अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना न्याय कसा मिळणार? हे अपेक्षितच होते. तरी देखील न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मी आदर करतो. मी कोणताही गुन्हा केला नाही मी जनतेच्या हिताचा फक्त मुद्दा मांडला तो भाजपच्या लोकांना झोंबला. विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचे आहे. मी सध्या बोलल्याबद्दल, भ्रष्टाचारा विरोधात आघाडी उभारल्याबद्दल मला तुरुंगात टाकायचं असेल, तर मी त्यासाठी तयार आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी दिली. तसेच याविरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही म्हटले आहे.