manoj jarange : मनोज जरांगे यांचे नवव्या दिवशी उपोषण स्थगित; सरकारला इशारा

manoj jarange : मनोज जरांगे यांचे नवव्या दिवशी उपोषण स्थगित; सरकारला इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज दि. २५ सप्टेंबर रोजी ९ व्या दिवशी उपोषण स्थगित केले आहे. ज्यांनी त्रास दिला त्यांना सरळ करणार… तर आरक्षण न दिल्यास सत्तेत बसून आरक्षण घेऊ. सलाईन घेऊन उपोषण करु शकत नाही. मराठा बांधवांच्या आग्रहाखातर अंतरवालीमध्ये जमलेल्या महिला आणि बांधवांच्या हस्ते पाणी पिऊन जरांगेंनी हे आंदोलन स्थगित केलं. मनोज जरांगे (manoj jarange) यांच्यावर आता छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. त्यांची तब्येत खालावत चालली होती. त्यामुळे मराठा समाजात भीतीचे बाटवरण होते.
ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर मोर्चा; …तोपर्यंत आंदोलन सुरूच !
मराठा आंदोलक आक्रमक; सोलापूर-धुळे महामार्गावर रास्ता रोको
… तर सत्तेत बसून आरक्षण
दरम्यान आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखी काही दिवसांची मुदत दिली आहे. आचारसंहिता लागेपर्यंत राजकीय भाषा बोलणार नाही. पण त्यानंतर कोणी काय म्हटलं तर मी त्याला सोडणार नाही. फडणवीस साहेब तुमच्या हाताने सत्ता पाडू नका. मी काहीच येऊ देणार नाही असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तुम्ही जर आरक्षण दिलं नाही तर सत्तेत बसून आरक्षण घेणार असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
श्रीमंत मराठ्यांच्या मागे फिरू नका
“माझ्या लोकांना मारहाण केली, पण माझं ऐकून त्यांनी मार खाल्ला. सरकारने आरक्षण दिलं नाही तर आपण सत्तेत बसून आरक्षण घेणार. श्रीमंत मराठे आपली पोरं कधीच मोठ होऊ देणार नाहीत. शेतकरी मराठा रात्रंदिवस चिखलात, उन्हात काम करून आपलं लेकरु कधी नोकरीला लागेल याची वाट बघतो. मजूर मराठादेखील त्याची वाट बघतो. त्यामुळे मराठा आरक्षण मिळावं अशी इच्छा प्रत्येक मराठा बांधवाची आहे.” त्यामुळे समाजाने कोणत्याही राजकीय नेत्याच्या मागे फिरू नका असे मनोज जरंगे पाटील यांनी म्हटले आहे.
गेल्या नऊ दिवसांपासऊन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले होते. मात्र त्याच वेळी लक्ष्मण हाके यांनी विरोधी उपोषण सुरु केले होते. एवढे दिवस उपोषण केले, मात्र सरकारकडून कोणत्याचप्रकारे हालचाल व दाखल घेतली नाही. मात्र याचदरम्यान त्यांची प्रकृती खालावली असल्याने समाजाच्या आग्रहाखातर त्यांनी आज उपोषण केले होते. मात्र ते आज स्थगित केले आहे.
1 thought on “manoj jarange : मनोज जरांगे यांचे नवव्या दिवशी उपोषण स्थगित; सरकारला इशारा”