मराठा आंदोलक आक्रमक; सोलापूर-धुळे महामार्गावर रास्ता रोको

मराठा आंदोलक आक्रमक; सोलापूर-धुळे महामार्गावर रास्ता रोको
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केलं असून आज त्यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस आहे. मात्र, तरीही राज्य सरकारने त्यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही. तसेच त्यांची तब्येत खालावल्यामुळे मराठा आंदोलकांनी आक्रमक होत वडीगोद्री येथे सोलापूर-धुळे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं आहे.
बार्टी-सारथीच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार
दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरंगे हे अनेक दिवसापासून आंदोलन करत आहेत. त्यांनी आपल्या विविध मागण्या सरकारकडे केल्या आहेत. त्यासाठी सरकारने त्यांना आपण मागण्या पूर्ण करणार असल्याचे म्हटले. मात्र त्यानंतर त्यांनी वेळकाढूपणा केला. मात्र आता जरांगे यांचे हे सहावे आमरण उपोषण सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज अथवा दिवस आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी आंदोलनाला भेट दिली. त्यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे. तसेच राजरत्न आंबेडकर, ऑल इंडिया पँथरचे दीपक केदार यांनी देखील भेट दिली होती. त्यांनी देखील आम्ही मराठा आंदोलनात सहभागी असल्याचे म्हटले. मात्र साकारकडून अद्याप कोणताच प्रतिसाद मिळत नाही. त्यातच दिवसेंदिवस जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे. त्यामुळे आक्रमक होत मराठा आंदोलकांनी सोलापूर – धुळे महामार्ग अडवून मराठा समाजाला आरक्षण आणि जरांगे पाटील यांची दखल घेण्याची समाजाकडून मागणी केली जात आहे.
1 thought on “मराठा आंदोलक आक्रमक; सोलापूर-धुळे महामार्गावर रास्ता रोको”