SRPF CENTER :…ठिय्या, बंदोबस्त… घोषणाबाजी; पवारांनी केले SRPF केंद्राचे लोकार्पण !

2
rohit pawar - srpf

SRPF CENTER :…ठिय्या, बंदोबस्त… घोषणाबाजी; पवारांनी केले SRPF केंद्राचे लोकार्पण !

अहमदनगर (प्रतिनिधी) – जामखेडच्या कुसडगावच्या राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण वादग्रस्त ठरताना दिसत आहे. आमदार रोहित पवारांनी मंजूर केलेल्या या केंद्राचे लोकार्पण माजी मंत्री अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी पोलिसांनी या केंद्रावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आणि रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी केंद्राच्या बाहेरच ठिय्या मांडला आणि देवेंद्र फडणवीस, आमदार राम शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी केली.

आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने होत असलेल्या राज्य राखीव दल प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी अडवले. पोलिसांनी चार चाकी वाहने, लोखंडी बॅरॅकेट्स आणि लाकडाच्या सहाय्याने रस्ता बंद केला होता. त्यामुळे प्रवेशद्वारावरच रिबीन कापून पवार यांनी लोकार्पण केले. दरम्यान या ठिकाणी आलेल्या आमदार रोहित पवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडवल्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केलं. संबंधित केंद्राचे काम अद्याप 100 टक्के पूर्ण झालेले नाही, असे म्हटले जात आहे. मात्र आता विधानसभेच्या तोंडावर श्रेयवादाच्या लढाई या मतदारसंघात सुरु झाली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?
यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कर्जत-जामखेडचं SRPF केंद्र दुसऱ्या जिल्ह्यात गेलं असताना त्याविरोधात एक ब्र शब्द काढण्याचीही इथल्या तत्कालीन लोकप्रतिनिधीची मंत्री असूनही हिंमत झाली नाही. पण मविआ सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी हे SRPF केंद्र पुन्हा कुसडगाव (ता. जामखेड) इथं मंजूर केल्याने ते आज सुरु झालंय. त्याच देशमुख साहेबांना आणि ज्यांनी 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला कर्जतचा ST डेपो मंजूर केला त्या अनिल परब साहेबांना या केंद्राची पाहणी करण्यापासून रोखण्यासाठी ‘एसआरपीएफ’ केंद्राच्या वाटेत चक्क काटे, बॅरिकेट्स आणि 200 पोलिसांचा बंदोबस्त लावण्याचं काम एका अहंकारी स्थानिक नेत्याच्या इशाऱ्यावर सरकार करतंय. पण स्वाभिमानी कर्जत-जामखेडकर त्यांचा अहंकार चिरडल्याशिवाय राहणार नाही आणि याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ!

तसेच पवार म्हणाले कि, राज्यात महिला भगिनी आणि चिमुकल्या मुलींवर खुलेआम अत्याचार होतात… दिवसाढवळ्या खून पडतात… कायदा व सुव्यवस्थेचे न भूतो न भविष्यती तीन तेरा वाजले.. तरी तिकडं लक्ष द्यायला राज्याच्या गृहमंत्र्यांना वेळ नाही… मात्र आम्ही मंजूर करून आणलेल्या आणि पूर्ण केलेल्या जामखेडमधील कुसडगावच्या SRPF केंद्राची पाहणी करु न देण्यासाठी असा शेकडो पोलिसांचा बंदोबस्त लावला जातोय.

मतदारसंघात त्यांनी म्हणजेच आमदार राम शिंदे यांनी विकासाला बाधा आणली मात्र, आपल्या प्रयत्नाने मःतदारसंघात विकास होत आहे. midc आणली. राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र आणले. यामाध्यमातून उद्योग येतील तालुक्याचा विकास होईल. शिंदे यांनी मात्र हे होऊ नये यासाठीच प्रयत्न केले असल्याची टीका रोहित पवार यांनी केली.

प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, जेष्ठ नेते दत्ताभाऊ वारे, जेष्ठ नेते सूर्यकांत नाना मोरे, माजी सभापती पंचायत समिती जामखेड संजय वराट सर,तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, मा सभापती तथा महिला तालुकाध्यक्ष सौ राजश्री ताई मोरे, जेष्ठ नेते राजेंद्र पवार, ओबीसी तालुकाध्यक्ष विश्वनाथ राऊत, युवक अध्यक्ष प्रशांत काका राळेभात, कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, शिवसेना तालुकाध्यक्ष गणेश उगले,उपाध्यक्ष हनुमंत पाटील,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष उमर कुरेशी,वसीम सय्यद, उपसभापती कैलास वराट,कार्याध्यक्ष सागर कोल्हे, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, रामहरी गोपाळघरे, अशोक पठाडे, शरद शिंदे, गणेश चव्हाण, गाडेकर सर,मंगेश दादा आजबे, पोले नाना, राजू गोरे,प्रकाश सदाफुले, ज्योतीराम बापू बांदल, किसन बापू ढवळे,हर्षल डोके, अमोल गिरमे,भाऊ कसरे, रघुनाथ मते,डॉ चंद्रशेखर नरसाळे,प्रसन्न कात्रजकर, नागेश कात्रजकर, माजी सरपंच शहाजी गाडे,पैलवान प्रदिप कात्रजकर, बापू कार्ले,प्रकाश काळे, मगर साहेब, संतोष शिंदे,सरपंच सुनिल आबा उबाळे, बाबासाहेब पोठरे,बिलाल शेख, बारगजे मेजर, शंकर गदादे, राहुल बेदमुथा, युवराज उगले,संचालक नारायण जायभाय, विठ्ठल चव्हाण,कुंडल राळेभात, गणेश म्हस्के,प्रविण उगले,शुभम हजारे, सचिन कात्रजकर, मनोज भोरे, प्रशांत वारे, नितीन ससाणे, जगदाळे मामा,रावसाहेब जाधव, विजय खाडे, अविनाश पठाडे, अमोल यादव, सचिन डोंगरे, संदीप गायकवाड, नय्युम शेख, गणेश हागवणे,श्रीनिवास भोगल, प्रशांत हिरवे, विशाल काकडे, अन्सार पठाण, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, सदस्य यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

2 thoughts on “SRPF CENTER :…ठिय्या, बंदोबस्त… घोषणाबाजी; पवारांनी केले SRPF केंद्राचे लोकार्पण !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.