मराठा आरक्षण : भातकुडगाव फाटा येथील उपोषण स्थगित

मराठा आरक्षण : भातकुडगाव फाटा येथील उपोषण स्थगित
शेवगाव (प्रतिनिधी) – शेवगाव -नेवासा राज मार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर मराठा सेवक चंद्रकांत महाराज लबडे, भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव,जोहरापूरचे सरपंच अशोक देवढे, प्रहारचे तालुकाध्यक्ष रामजी शिदोरे यांचे मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ चालू असलेले उपोषण माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, जनशक्तीचे शिवाजीराव काकडे, शेवगाव नायब तहसीलदार बक्रे, कु.धनश्री अर्जुन बनकर यांच्या प्रमुख उपस्थित लिंबू पाणी घेऊन उपोषण स्थगित करण्यात आले.
मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण प्रश्नी अंतरवाली सराटी येथे चालु असलेले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मराठा सेवकांनी भातकुडगाव फाटा येथील उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असून त्यावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली.
यावेळी शिवशाहीर कल्याण महाराज काळे,राष्ट्रीय भारुडकार हमीद सय्यद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक मेरड, रांजणीचे सरपंच काकासाहेब घुले, दहिगावनेचे सरपंच राजाभाऊ पाऊलबुदे, देवटाकळीचे सरपंच माऊली खरड, हिंगणगावचे सरपंच सतीश पवार, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, मराठा महासंघाचे रावसाहेब मरकड,भायगावचे माजी सरपंच अशोक दुकळे, भगवान आढाव, ढोरसड्याचे सरपंच माऊली निमसे, विकास संस्थेचे चेअरमन बाळासाहेब मरकड, संभाजी गवळी, कामधेनु पतसंस्थेचे बाळासाहेब काळे, सचिन फटांगरे, भाऊसाहेब सातपुते, सोनईचे कामगार तलाठी विजय जाधव,संतोष मेरड, मच्छिंद्र आर्ले,राजेंद्र चव्हाण, आबासाहेब राऊत, अशोक फटांगरे, बाबा साबळे, आण्णासाहेब दुकळे, भास्कर चोपडे,ज्येष्ठ पत्रकार आर आर माने,भाऊराव फटांगरे,अॅड अतुल लबडे, प्रदिप लबडे, गणेश शिंदे, देवधन वाघमारे, अशोक पंडित, कल्याण काकडे, दिपक शेडे, राम उगले, योगेश जाधव, आदिनाथ खरड, दादासाहेब देवढे, सुरेश लांडे, पत्रकार शहाराम आगळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.