छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
मुंबई – मंत्री छगन भुजबळ यांची गुरुवारी (दि. 26 सप्टेंबर) सायंकाळी प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना पुण्याहून विशेष विमानाने मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ याना गुरुवारी सकाळपासूनच त्यांची प्रकृती काहीशी खालावलेली होती. मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याला येणार असल्याने आणि भिडे वाद येथे भेट देणार असल्याने भुजबळ आवर्जून येथे आले होते. अचानक दुखू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईला हलवण्यात आले. त्यांच्या निकटवर्तिनयनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.