Anemia : देशातील ३१ टक्के मुले तर १९ टक्के पुरुष अशक्त; NMC अहवालातून स्पष्ट !

Anemia : देशातील ३१ टक्के मुले तर १९ टक्के पुरुष अशक्त; NMC अहवालातून स्पष्ट !
NMC REPORT ON ANEMIA – देशातील २८ राज्यांतील विविध जिल्हे आणि शहरांमध्ये 11 जून ते 7 ऑगस्ट 2024 दरम्यान आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांच्या आधारे NMC ने पहिला सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा पाहणी अहवाल पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा व्ही. वणीकर यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आला आहे. तसेच 40,829 मुलांपैकी 31% मुले अशक्त आढळून आली आहेत. सर्वेक्षणाच्या आधारे ऍनिमियाची (anemia) हि समस्या सुमारे 38% महिलांमध्ये, तर 39% गर्भवती महिलांमध्ये आणि 19% पुरुषांमध्ये आली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यापुढेही सर्वेक्षण होण्याची शक्यता आहे.
Read This : SRPF CENTER :…ठिय्या, बंदोबस्त… घोषणाबाजी; पवारांनी केले SRPF केंद्राचे लोकार्पण !
दरम्यान ॲनिमियामध्ये लाल रक्तपेशींची संख्या किंवा हिमोग्लोबिनची पातळी कमी होते. यावेळी 2,73,656 कुटुंबातील 12,09,338 लोकांची आरोग्य तपासणी केली गेली. त्यासाठी 1300 हून अधिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात देशातील ४९६ वैद्यकीय महाविद्यालयातील ८५ टक्के एमबीबीएस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बीपीची समस्या 17% आणि साखरेची समस्या 14% इतकी आढळून आली. शिबिराचा एकूण 2.58 लाख लोकांनी लाभ घेतला आणि 1.99 लाख लोकांना डोअर स्टेप आरोग्य सेवेची सुविधा मिळाली असल्याची माहिती MNC च्या माध्यमातून देळण्यात आली.
MBBS विद्यार्थ्यांसाठी कुटुंब दत्तक कार्यक्रम
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) 2023-24 पासून सर्व MBBS विद्यार्थ्यांसाठी कुटुंब दत्तक कार्यक्रम लागू केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासादरम्यान एक कुटुंब दत्तक घ्यावे लागेल आणि त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
1 thought on “Anemia : देशातील ३१ टक्के मुले तर १९ टक्के पुरुष अशक्त; NMC अहवालातून स्पष्ट !”