BANK HOLIDAYS 2024 : ऑक्टोबर महिन्यात बँका एवढे दिवस राहतील बंद…

BANK HOLIDAYS 2024 : ऑक्टोबर महिन्यात बँका एवढे दिवस राहतील बंद...
BANK HOLIDAYS 2024 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑक्टोबर महिन्यातील सुट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सुट्यांचा हंगाम असणार आहे. या महिन्यात गांधी जयंती (Gandhi Jayanti), नवरात्री (Navratri), दसरा (Dussehra) आणि दिवाळी (Diwali) असे एकामागून एक सण आले आहेत. त्यामुळे सुमारे १५ दिवस बँकांना सुट्टी (BANK HOLIDAYS) असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि चाकरमान्यांनी वेळीच आपली बँकेतील कामे करून घ्यावीत.
read this : Anemia : देशातील ३१ टक्के मुले तर १९ टक्के पुरुष अशक्त; NMC अहवालातून स्पष्ट !
दरम्यान RBI च्या यादीनुसार, ऑक्टोबर महिन्यात 31 दिवसातील जवळपास 15 दिवस सुट्टी असणार आहे. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्यांचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती , नवरात्री , दसरा आणि दिवाळीच्या सुट्या आहेत. या दिवशी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकांची कामे वेळेत उरकावीत. बँक जरी या काळात बंद असल्या तरी देखील ऑनलाईन सेवा सुरु राहतील.
या दिवशी बँक बंद राहतील…
1 ऑक्टोबर – जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुक
2 ऑक्टोबर – गांधी जयंती
3 ऑक्टोबर – नवरात्री काही ठिकाणी सुट्टी
6 ऑक्टोबर – रविवार
10 ऑक्टोबर – दुर्गा पूजा, दसरा आणि महासप्तमी
11 ऑक्टोबर – दसरा, महाअष्टमी, महानवमी, आयुध पूजा, दुर्गा अष्टमी
12 ऑक्टोबर – दसरा, विजयादशमी, दुर्गा पूजा
13 ऑक्टोबर – रविवार
14 ऑक्टोबर – दुर्गा पूजा गंगटोक येथे सुट्टी
16 ऑक्टोबर – लक्ष्मी पूजे काही ठिकाणी सुट्टी
17 ऑक्टोबर – महर्षि वाल्मीकि जयंती आणि कांटी बिहू सण
20 ऑक्टोबर – रविवार
26 ऑक्टोबर – चौथ्या शनिवार
27 ऑक्टोबर – रविवार
31 ऑक्टोबर – दिवाळी
2 thoughts on “BANK HOLIDAYS 2024 : ऑक्टोबर महिन्यात बँका एवढे दिवस राहतील बंद…”