Dharvir – 2 : धर्मवीर -२ चित्रपटाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्क्रिनींग ! राऊतांची टीका …

धर्मवीर -२ चित्रपटाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्क्रिनींग ! राऊतांची टीका ...
(धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे” भाग १ या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाच्या टीमने आता धर्मवीर -२ मुक्काम पोस्ट ठाणे – साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ (dharmvir -2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. तो लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. यामध्ये धर्मवीर आनंद दीघे यांचा जीवनप्रवासाचं दाखवण्यात आला आहे. मात्र यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविषयी देखील काही क्षण दाखवण्यात आला आहे. मात्र याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग शुक्रवारी ठाण्यातील विवियाना मॉल येथील चित्रपटगृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चित्रपटाची टीम उपस्थित होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. ‘धर्मवीर’ चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यापासून लोकांना या चित्रपटाचा दुसरा भाग कधी पहायला मिळणार याबाबत उत्सुकता होती. त्यामुळे ‘धर्मवीर-२’ मधून गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी केलेले कार्य पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केल्याचे शिंदे यांनी म्हटले.
Read This : BANK HOLIDAYS 2024 : ऑक्टोबर महिन्यात बँका एवढे दिवस राहतील बंद…
तसेच धर्मवीर दिघे साहेबांनी संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम केले. कोण कुठल्या जाती – धर्माचा आहे हे न पाहता त्यांच्या अडचणी आपल्या मानून त्याच्या मदतीला धावून गेले. कार्यकर्त्याला कायम आपलं मानून त्याला बळ दिले. त्यांचे आयुष्य पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आणताना आनंद होत असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
या चित्रपटात अभिनेते प्रसाद ओक यांनी धर्मवीर आनंद दिघे यॆची भूमिका साकारली आहे. पण खऱ्या आयुष्यात ते त्यांना कधीही भेटले नव्हते. निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांच्याशी मात्र धर्मवीर आनंद दीघे यांची भेट झालेली होती. या चित्रपटात दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी मात्र अतिशय समर्पक शब्दात त्यांचा जीवनप्रवास मांडून तो लोकांसमोर आणला आहे. अभिनेते क्षितिज दाते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. तसेच इतरही अनेकांच्या भूमिका या सिनेमात आहेत. त्यांच्या या विविधांगी अभिनयाने आणि कथानकाच्या चित्रपट यशस्वी होईल असेच दिसतेय.
दरम्यान चित्रपटाच्या स्क्रीनिगवेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आणि चित्रपटातील प्रमुख कलावंतांना सन्मानितही केले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, भाजपचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले, निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते प्रसाद ओक, क्षितिज दाते, अभिजित खांडकेकर, अशोक शिंदे, श्वेता शिंदे, महेश लिमये आदी उपस्थित होते.
… हा साहेबांचा अपमान : राऊत
धर्मवीर दिघे साहेबांचं पार्थिव एकनाथ शिंदे घेऊन जाताना दाखवलं आहे. हा दिघे साहेबांचा अपमान आहे. खरं तर ठाण्याच्या पाचपाखाडीत ऑस्करचं ऑफिस टाकलं पाहिजे आणि यांना ऑस्कर देऊन गौरवलं पाहिजे, असा टोला लगावतानाच या सिनेमाच्या सुरुवातीलाच हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत नाही, अशी ओळ टाकली पाहिजे, असं शिवसेना उबाठा गटाचे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.