मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचे १० जागा जिंकून पुन्हा निर्विवाद वर्चस्व !

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचे १० जागा जिंकून पुन्हा निर्विवाद वर्चस्व !
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या (shivsena ubt) युवासेनेने दोन वर्षांच्या विलंबानंतर झालेल्या निवडणुकीत 10 पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर रात्री मुंबई विद्यापीठाबाहेर ठाकरे गटाकडून एकच जल्लोष करण्यात आला.
यावेळी विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी सर्वांचे अभिनंदन करून येथूनच पुढील निवडणुकीचा प्रवास सुरु होत असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच विधानसभा निवडणुकीत देखील हिट कर्मगिरी करू असे, त्यांनी म्हटले.
BANK HOLIDAYS 2024 : ऑक्टोबर महिन्यात बँका एवढे दिवस राहतील बंद…
आदित्य ठाकरेंच्या युवासेनेने दहाच्या दहा दहा जिंकून भाजप प्रणित आखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा धुव्वा उडवला आहे. सर्व विजयी उमेदवार शिवसेना प्रमुख (ubt) उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरेंची भेट घेणार आहेत.
युवासेनेच्या सर्व विजयी उमेदवारांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी प्रमाणपत्र दिले. यामध्ये 5 जागांसाठी खुल्या प्रवर्गातून प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अल्पेश भोईर, परमात्मा यादव आणि किसन सावंत हे उमेदवार विजयी झाले. तर राखीव प्रवर्गातील निवडणूकीतून अनुसूचित जाती या प्रवर्गातून शितल शेठ देवरुखकर, अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनराज कोहचाडे, विजा/ भज प्रवर्गातून शशिकांत झोरे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून मयुर पांचाळ आणि महिला प्रवर्गातून स्नेहा गवळी हे उमेदवार निवडून आले.