Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिजीत बिचुकलेची “मै हू डॉन”ने एण्ट्री ! कल्ला… वाद…

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिजीत बिचुकलेची "मै हू डॉन"ने एण्ट्री ! कल्ला... वाद...
Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. कारण बिग बॉसच्या घरात राखी सावंत आणि पाठोपाठ बिगबॉसच्या घरातील सदस्यांची शाळा घ्यायला अभिजीत बिचुकले येणार आहेत. अभिजीतच्या येण्याने आज घरात वाद, भांडणे, राडा, गोंधळ, ड्रामा आणि बरेचकाही पाहायला मिळणार आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘बिग बॉस मराठी’च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले एण्ट्री करताना दिसत आहेत. घरात येताच अभिजीत बिचुकले म्हणतात, “डॉ. अभिजीत बिचुकलेचा सादर नमस्कार.” अभिजीतच्या एन्ट्रीला ‘मैं हूँ डॉन” हे गाणं खास वाजवण्यात आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा त्याच्या स्टाईलने धुमाकूळ काळातील असेच दिसतेय.
नवा प्रोमो झालाय खूपच व्हायरल…
‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकले घरातील सदस्यांचा त्यांच्या स्टाईलने पाणउतारा करताना दिसणार आहे. अंकिताची शाळा घेत बिचुकले म्हणताय, “बहिण असे कधीच करत नाही, कुचकेपणा तुमचा दिसला. राग येतोय मला… मी काहीही फोडू शकतो या घरातले.” आता बिचुकले का चिडले आहेत हे बिग बॉस मराठीचा आजचा एपिसोड पाहिल्यावर कळणार आहे. प्रेक्षकांमध्ये या भागाची उत्सुकता शिगेला पोहाचली आहे.
“शो”च्या विजेत्याविषयी तर्कवितर्क…
बिग बॉस मराठी सिझन ५ ची फिनाले ६ ऑक्टोबर रोजी आहे. सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, वर्षा उसगावकर, जान्हवी किल्लेकर, पांडुरंग कांबळे, धनंजय पोवार हे स्पर्धक बिग बॉसच्या घरात सध्या आहेत. आता यंदाची ट्रॉफी कोणाला बेतणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.