शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! basmati rice : बिगर बासमती तांदळाला निर्यात शुल्कातून सूट

शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! बिगर बासमती तांदळाला निर्यात शुल्कातून सूट
Basmati Rice : दिवाळी सणाच्या अगोदरच शेतक-यांसाठी केंद्र सरकाने आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाला (basmati rice) निर्यात शुल्कातून सूट दिली आहे. उकडा तांदळावरील कर 10 टक्क्यांनी कमी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे.
दरम्यान केंद्राने बासमती तांदळावरील निर्यातमूल्य हटवल्यानंतर 15 दिवसांतच तांदळाच्या निर्यात शुल्कात कपात केली आहे. ब्राऊन राईस वरील निर्यात शुल्कातही आता 10 टक्के कपात करण्यात आली आहे. आतापर्यंत ब्राऊन राईस तसेच गैरबासमती पांढ-या तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क आकारले जात होते. आता मात्र शुक्रवारपासून हे निर्यात शुल्क सरकारकडून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.