Pune Metro”पुणे मेट्रो”चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन ; शिंदे, पवार, फडणवीसांनी सहकाऱ्यांसह केला प्रवास

"पुणे मेट्रो"चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन ; शिंदे, पवार, फडणवीसांनी सहकाऱ्यांसह केला प्रवास
Pune Metro : पुणे शहरातील अत्यंत महत्वाच्या अशा पुणे मेट्रो टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन आणि पुणे मेट्रोच्या (Pune Motro) जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा शुभारंभ तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाचे आणि सोलापूर विमानतळाचे उद्घाटन आज दि. २९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑरिक आणि बिडकीन प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक हॉल, डीएमआयसी प्रकल्प, शेंद्रा, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत येथे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, आदींनी पुणे मेट्रोच्या नवीन मार्गावरून प्रवास केला.
दरम्यान पुण्यातील या २२ हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पण गुरुवारी होणार होते. मात्र पावसामुळे व्यत्यय होऊ नये यासाठी माननीय पंतप्रधान महोदयांनी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. यावरून टीका देखील विरोधकांकडून केली गेली होती. मात्र आता हि मेट्रो पुणेकरांच्या सेवेत सुरु झाली आहे.
यावेळी केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, युवासेनेचे किरण साळी आदी उपस्थित होते.