Rain : विश्रातीनंतर नवरात्री, दिवाळीत पाऊस कोसळणार

Rain : विश्रातीनंतर नवरात्री, दिवाळीत पाऊस कोसळणार
राज्यात काही भागात सलग तीन दिवस मुसळधार तसेच हलकासा पाऊस (rain) पडला. मात्र त्यानंतर पाऊस ओसरला. आता 5 ऑक्टोबरपर्यंत काही ठिकाणी हलक्या पावसाची (rain) शक्यता आहे. मात्र नवरात्री (navratru) आणि दिवाळी (diwali) यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तास अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात येत आहे.
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्रासह किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दोन दिवसपुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात आज दि. 30 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, बीड, अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तास अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. बंगलाच्या उपसागरात सध्या चक्रीवादळासारखी स्थिती मंदावली असल्याने पावसाचा जोर कमी झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र आता मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास रखडला आहे. 23 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली तरी हा प्रवास रखडल्याने दिवाळीतही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
10 ते 17 ऑक्टोबर दरम्यान मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान यावर्षी नवरात्री आणि दिवाळीत पाऊस पडणार असल्याने हिवाळा उशिराने सुरु होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता लगबगीने आपली कामे उरकून घ्यावीत. असे हवामानात विभागाने म्हटले आहे.