Narayan Gadh : आपल्या समाजासाठी, लेकरांसाठी आता उलथापालथ करावीच लागणार

0
narayan gadh

नारायण गड येथे उपस्थित लाखोंचा जनसमुदाय... आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, महंत शिवाजी महाराज आदी.

संघर्षयोद्धा मनोज जरंगे पाटील यांचा इशारा; आचारसंहितेनंतर निर्णय घेणार

Manoj Jarange Patil dasra melava : मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या डोळ्यातील पाणी नाही पाहू शकत. कोणतीही जहागिरदाराची औलाद येऊ द्या, आता झुकायचे नाही. कुणालाही पाय लावायचा नाही. कुणावर अन्याय करायचा नाही. पण समाजावर अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करायला शिका. आपल्याविरोधात षडयंत्र केले जात आहे. आपल्याला डावलले जात आहे. आपल्याला नाकारून टार्गेट केले जात आहे. सावध व्हा. आता त्यांचे डोळे उघडले असतील यांना टार्गेट केले की संपले. नारायण गडावर बोलत असताना आपल्याला काही मर्यादा आहेत त्या पाळाव्या लागत आहेत. जर न्याय नाही मिळाला तर तुमच्या लेकरासाठी तुमच्या समुदायासाठी आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार आहे. त्याशिवाय पर्यायच नाही. आपल्या नाकावर टिच्चून जर कुठले निर्णय होत असतील या राज्यातील समाजावर अन्याय होणार असेल तर लेकरांची आणि राज्यातील समाजाची शान वाढवण्यासाठी संबंधितांना गाडावच लागणार आहे, असे म्हणत नारायण गडावरून (narayan gadh) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी सरकारला आणि विरोधकांना थेट इशारा दिला.

बीड जिल्ह्यातील नारायण गड (narayan gadh) येथे पारंपरिक दसरा मेळावा पार पडला. यावेळी महंत शिवाजी महाराज (mahant shivaji maharaj) यांचा सत्कार करण्यात आला. नारायण गडावर होणाऱ्या या मेळाव्याने आजपर्यंतच्या दसरामेळाव्याचा उच्चांक गाठलेला पाहायला मिळाला. सुमारे ९०० एकरावर हा मेळावा पार पडला. यावेळी ५०० एकर जागा मेळाव्याला आणि २०० एकर पार्किंगसाठी होते. तर यावेळी सर्व समाजातील भक्तांची सोया करण्यात आली होती. लाखोंची गर्दी येथे पाहायला मिळाली. दरम्यान जरंगे पाटील पुढे बोलताना म्हणाले कि, मला तुमच्याकडून जास्त काही नको. तुम्ही मला एकच वचन द्या. मग मी मात्र तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. फक्त हट्ट धरू नका. एकच वचन द्या. जर आपल्या राज्यातील जनतेवर अन्याय झाला आणि एकदा सांगितलं हेच करायचं तर तुम्हाला तेच करावे लागेल, मला हे वचन द्या. मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. पण मला तुमच्याकडून एकच वचन हवे. मला राजकारण आणि जातीचं या गडावरून बोलायचं नाही. तुमचं हित सोडून मी तुमच्या पुढे जाणार नाही, तुमचं काम सोडून जाणरा नाही हा गडावरून शब्द देतो, अशी भावनिक साद मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला घातली आणि सर्वानी पाटील… नावाचा जयघोष आणि हात वर करत आम्ही तुमच्या सोबत असल्याचे उपस्थित जनसमुदायाने म्हटले.

मला संपवण्यास घाट घातला जातोय…
मला पूर्ण घेरलं आहे. मला संपवण्याचा घाट घातला आहे. मी गडावर खोटं बोलणार नाही. मला सांगावं लागतं. माझा त्रास माझ्या समाजाला नाही सहन होत नाही. माझ्या समाजाचा त्रास मला सहन होत नाही. मला होणाऱ्या वेदना मी चेहऱ्यावर आणत नाही . मला त्रास झाला तर समाज रात्र न् दिवस ढसाढसा रडतोय. माझ्या समाजाच्या लेकराला तुमच्यामुळे कलंक लागू देऊ नका. माझ्या समाजाची लेकरं हरवू देऊ नका. मला हे वचन द्या, असं जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगेंनी दंड थोपटले
एक गोष्ट लक्षात ठेवा. शेवटी आपल्यापुढे पर्याय नाही. मुख्य भूमिका तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. आचारसंहितेनंतर तुम्हाला मुख्य भूमिका सांगणार आहे. यांनी आपल्याला फसवलं. आता आपल्यापुढे एकच पर्याय. आचारसंहिता लागू द्यायची. नारायण गडावरून सांगतो, सरकारला सांगतो… सरकार… ओय सरकार… सुट्टी नाही भाऊ, असं म्हणत जरांगे यांनी दंड थोपटले. आचारसंहिता लागायच्या आत राज्यातील प्रश्नाची अंमलबजावणी करायची. नाही केली तर आचारसंहिता लागल्यावर सांगेल ते करायचं. एक विचारानं सांगा करणार का. कारण इथून मला तुम्हाला निर्णय देता येत नाही. यांचं सर्व बघायचं, आणि येत्या काळात निर्णय घ्यायचा असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

शेतकरी, सर्व समाजासाठी आपल्याला काम करावे लागेल…
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला लढावं लागेल, त्यांना अनुदान नाही, पिकविमा नाही, मराठा आरक्षण नाही, धनगर आरक्षण नाही, कैकाडी, महादेव कोळी, लिंगायत यांना खाऊ दिलं जात नाही. मुस्लिम आणि दलितांना काही दिलं जात नाही. आपणच सर्वांसाठी झुंजत आहोत. आपणच सर्वांना न्याय देणार आहोत. काही लोक कशासाठी भिजत आहे. आपण जातीसाठी भिजत आहोत. काय होतं त्याला. याला शुभसंकेत समजा. आता तर गाडलेच समजा…, अशाप्रकारे सरकारला शेतकरी आणि बाराबलुतेदार यांच्या प्रश्नांसाठी धारेवर धरत टीका केली. तसेच सर्व समाजाला एकत्र करून लढणार असल्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत.

आता धक्का लागत नाही का ?
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मला आणि माझ्या समाजाला शब्द पाहिजे आणि उत्तर पाहिजे. काल 17 जाती ओबीसीमध्ये गेल्या आता तुम्हाला धक्का लागत नाही का? तुम्हीच म्हणालात. ज्या वेळी आम्ही आरक्षण मागितलं. त्यावेळी एकजण म्हणाला, महाविकास आघाडीमधून लिहून घ्या. आता मला उत्तर द्यायचं. तुम्ही 17 जाती ओबीसीमध्ये घातल्या. तुम्ही महाविकास आघाडीमधून लिहून घेतलं का? ज्यावेळी आपण मागत होतो, त्यावेळेस म्हणाले धक्का लागतो. आता एकजण बोलत नाही
.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.