Atul Parchure : अभिनेते अतुल परचुरे कालवश !

Atul Parchure : अभिनेते अतुल परचुरे कालवश !
Atul Parchure Death : मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं आज दि. १४ ऑक्टोबर रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वार शोककळा पसरली आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती.
मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. इतकच नव्हे तर त्यांनी कर्करोगावर मात करत रंगभूमीवरचा अंक सुरुच ठेवला होता. अतुल परचुरे यांनी पु.ल.देशपांडे यांची व्यक्ती आणि वल्ली या नाटकातून अगदी हुबेहुब भूमिका साकारली होती. तसेच “नातीगोती” ‘वासूची सासु’, ‘प्रियतमा’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ कापूसकोंड्याची गोष्ट, या नाटकांमधल्याही त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
दरम्यान सलाम-ए-इश्क’, ‘पार्टनर’, ‘ऑल द बेस्ट: फन बिगिन्स’, ‘खट्टा मीठा’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ या हिंदी सिनेमांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केले. तसेच त्यांनी अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, भागो मोहन प्यारे, जागो मोहन प्यारे, माझा होशील ना या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे.