Bhagwan gad : भगवान गडाच्या उत्तराधिकाऱ्याची नामदेव शास्त्री यांनी केली घोषणा !

भगवान गडाच्या उत्तराधिकाऱ्याची नामदेव शास्त्री यांची केली घोषणा
अहमदनगर (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या भगवान गडाचा (bhagwan gad) पुढचा उत्तराधिकारी ठरला आहे. याबाबत महंत नामदेव शास्त्री (namdev shasri) यांनी घोषणा केली आहे. भगवान गडाचे पुढील उत्तराधिकारी म्हणून कृष्णा शास्त्री यांच्या नावाची नामदेव शास्त्री यांनी घोषणा केली. कृष्णा शास्त्री (krushna shasri) हे भगवान गडाचे चौथे उत्तराधिकारी असणार आहेत.
श्रीक्षेत्र भगवानगडाचे चौथे उत्तराधिकारी म्हणून कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर नवनियुक्त महंतांना एकनाथवाडी येथून रथात बसवून ढोल-ताशा, टाळ-मृदंग, बाबांचा जयघोष करत भाविकांनी गडावर आणले. भगवानगडावर संत ज्ञानेश्वर माउली मंदिराचे काम सध्या सुरू आहे. दोन वर्षांनंतर ते काम पूर्ण होणार आहे. लोकार्पण सोहळ्याच्या वर्षी भगवान गडाचा अमृतमहोत्सव असून, या वेळी कृष्णा महाराज यांना गादीचे हस्तांतरण करण्यात येणार आहे.
कृष्णा महाराज शास्त्री यांचे गाव तेलंगणात आहे. तेथे महंत नामदेव शास्त्रींसोबत त्यांची भेट झाली होती. बारा वर्षांपूर्वी ते गडावर आले होते. ज्ञानेश्वरीचे संपूर्ण शिक्षण गडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठात झाले आहे. नामदेव शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध आध्यात्मिक विषयांचा अभ्यास पूर्ण केला आहे. कृष्णा शास्त्री यांनी तीन वर्षांपूर्वी एकनाथवाडी येथील निरंजन संस्थान या ठिकाणी महंत म्हणून कार्यभार स्विकारला आहे. महंत नामदेव शास्त्री यांनी अचानकपणे उत्तराधिकारीची घोषणा केल्याने आचार्य देखील व्यक्त होत आहे. मात्र या निवडीनंतर समाजातून काही प्रतिक्रिया देखील येण्याची शक्यता आहे.