केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय ; पिकांच्या MSP मध्ये वाढ !

केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय ; पिकांच्या MSP मध्ये वाढ ! - 1
farmers crop msp : केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना (farmers) दिवळी गोड करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अनेक पिकांचा एमएसपी (MSP) म्हणजेच किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने देशभरातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत रब्बी हंगामातील पिकांच्या एमएसपीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये गहू, मोहरी, हरभरा, मसूर, जवस, करडई आदी पिकाच्या भावात वाढ करण्यात आली आहे. तसे आता गहू याचे भावात प्रति क्विंटल 150 रुपये, तर मोहरी पिकाच्या दरात 300 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पिकांच्या MSP त वाढ …
सरकारने 2025-26 या वर्षासाठी एमएसपी (msp) निश्चित केली आहे. या निर्णयानुसार गहूच्या किंमतीत प्रति क्विंटल 150 रुपयांनी वाढवून ती 2425 रुपये इतकी केली आहे. आतापर्यंत हा दर 2275 रुपये इतका होता. मोहरीवरील एमएसपी 300 रुपये प्रति क्विंटलने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मोहरीचे दर आता 5950 रुपये इतका करण्यात आला आहे. याआधी हा दर 5650 प्रति क्विंटल इतका होता. केंद्र सरकारने हरभऱ्याचा एमएसपी 210 प्रति क्विंटलने वाढवला आहे. त्यामुळे हरभऱ्याचा दर हा प्रति क्विंटल 5650 इतका झाला आहे. याआधी तो दर 5440 रुपये प्रति क्विंटल असा होता. मसूरीवरील एमएसपी ही प्रति क्विंटल 275 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मसुरीचा दर हा 6425 रुपयांवरुन 6700 रुपये प्रति क्विंटल झाला आहे.
एमएसपी म्हणजे काय? आणि ते का लागू केले जाते?
एमएसपी (msp) म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना मिळणारा हमी भाव. त्या पिकाचे भाव बाजारात कमी असले तरी. बाजारातील पिकांच्या किमतीतील चढ-उतारांचा शेतकऱ्यांवर परिणाम होऊ नये, असा यामागचा उद्देश आहे. भारतीय अन्न महामंडळ हे अन्नधान्य खरेदी आणि साठवणुकीसाठी जबाबदार असते. केंद्र सरकारने घोषित केलेल्या एमएसपीवरच भारतीय अन्न महामंडळ शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करत असते.
“एमएसपी”मध्ये या पिकांचा समावेश केला गेला आहे…
सरकार 22 पिकांसाठी एमएसपी ठरवत लाहे. त्यात भात, गहू, मका, बाजरी, ज्वारी, नाचणी आणि जवस या 7 प्रकारच्या धान्यांचा समावेश आहे. हरभरा, तूर, उडीद, मूग आणि मसूर या 5 प्रकारच्या डाळींचा समावेश आहे. तसेच मोहरी, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, करडई, नायजर या 7 तेलबियांचा तर ऊस, कापूस, आणि कच्चा ताग या 3 व्यावसायिक पिकांचा देखील एमएसपीत समावेश केला गेला आहे.