Central Governtment Employee : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ.. कर्मचारी, पेन्शन धारकांनाही होणार लाभ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ.. कर्मचारी, पेन्शन धारकांनाही होणार लाभ - 1
DA HIKE : केंद्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. त्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Governtment Employee) महागाई भत्त्यात (DA HIKE) सुमारे ३ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. केंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी हे मोठे गिफ्ट दिले आहे. यांची कर्मचारी मोट्या आतुरतेने वाट पाहत होते.
दरम्यान ही वाढ कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीच्या आधारावर असनार आहे. कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा देणे हा महागाई भत्ता देण्यामागचा मुख्य उद्देश आहे. सध्या डीए ५० टक्के आहे. आता सरकारने यामध्ये ३ टक्क्यांनी वाढ केली आहे. म्हणजेच जुलै २०२४ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुमारे ५३ टक्के डीए लागू होणार आहे.
महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत तीन महिन्यांची थकबाकी आणि वाढलेला डीए एकत्र मिळणार आहे. केंद्र सरकार महागाई भात्यात वर्षातून दोन वेळा केली जाते. याचा लाभ आता या कर्मचाऱ्यांना होणार आहे.