maratha assembly election :मराठा समाजाचं ठरलं… मनोज जरांगे निवडणुकीच्या मैदानात !

मराठा समाजाचं ठरलं... मनोज जरांगे निवडणुकीच्या मैदानात !
Manoj Jarange Patil – राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections) बिगुल वाजले आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच सरकारवर प्रामुख्याने भाजपचे नेते तथा पुमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली हाती.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे की लढवायचे याच्या अंतिम निर्णयासाठी मराठा समाजाची आज दि. २० ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक पार पडली. बैठकीतून मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. राज्यातील ज्या ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार निवडून येतील तेथे उमेदवार निवडून आणू आणि जिथे येणार नाहीत तिथे कोणत्याही पक्षाचा उमेदवार असेल तिथे जो उमेदवार ५०० रुपयाच्या बॉण्डवर आपल्याला समर्थन देईल त्या उमेदवाराला मतदान द्यावे, असे भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे.
एससी आणि एसटीच्या जागेवर उमेदवार देण्यात येणार नाहीत
तसेच मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, जिथं निवडून येतील तिथे उमेदवार उभे करणार आहे. एससी आणि एसटीच्या जागेवर आपण उमेदवार देणार नाही, आपल्या विचारधारेशी असणाऱ्यांना आपण निवडून आणायचं आहे. ज्या ठिकाणी आपण उभा करायचं नाही, तिथे आपण जो ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून देईल त्याला आपण निवडून आणायचे, बाकीचे सर्व पाडायचे असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. ते म्हणाले की, आता आपण सर्व जाती धर्माचे लोक उभे करायचे आहेत. कुठे मराठा, दलित मुस्लिम समीकरण जुळते का? याचाही अंदाज घ्यायचा आहे. एका जातीवर सीट निवडून येऊ शकत नाही. समीकरण जुळून येतोय का बघू, तुम्ही फॉर्म भरा, 29 तारखेला ज्याला फॉर्म काढायचा आहे त्यानं काढायचा. असेही त्यांनी सांगितले.