भाजपच्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर.. मंत्री विखेंसह जिल्ह्यातील याना संधी

भाजपच्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर.. मंत्री विखेंसह जिल्ह्यातील याना संधी
महाराष्ट्रात सर्वत्र राजकीय धूळमाळी सुरु झाली असुन यामध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित केले जात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. मात्र ज्यावर सहमती झाली आहे तेथे सर्वात अगोदर आज भाजपकडून आज दि. २० ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.
भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव मधून मोनिकाताई राजळे, श्रीगोंदा येथून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते याना संधी देण्यात आली आहे. तर राहुरीत माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, जंकखेड येथून आमदार राम शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र आता मलहविकास आघाडी आणि महाशक्ती यांच्या उमेदवारांची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील उमेदवार देणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी तिरंगी तर काही ढिकानी दुरंगी लढत होईल असेच चित्र सध्यातरी दिसतेय.
विशेष म्हणजे भोकरमधून खासदार अशोक चन्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याणमधून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.