24/10/2025

farmer loans : कर्जमाफीच्या पैशांत साखरपुडे, लग्न…

0
shetkari karjmafi - manikrao kokate

कर्जाच्या पैशांमधून लग्न, साखरपुडा करता असं माणिकराव कोकाटे यांनी या शेतकऱ्यांना सुनावलं.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य; विरोधकांची राजीनाम्याची मागणी आणि टीका

आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी (farmer loan) देऊ, असं महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सांगितलं होतं. त्यानंतर विधानसभेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा तब्बल 232 जगांवर विजय झाला. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता आली. आता सरकार कधी कर्जमाफी देणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही? यावरून आता संभ्रम निर्माण होताना दिसत आहे. अधिवेशनात सरकार कारमाफीवर काही निर्णय घेईल असे वाटत असताना अधिवेशन पुढे सरकले मात्र अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी तर शेतकऱ्यांना आता कर्जमाफी होणार नाही, पुढे पाहू असे संकेत दिले होते. त्यामुळे शेतऱ्यांना वाटत होते कि मार्च संपत आल्यावर तरी काही निर्णय होईल मात्र निर्णय काही झाला नाही. त्यामुळे शेतकर्यांत सरकारविरोधी नाराजीहोती.

त्यातच आता कुठल्या ना कुठल्या  वक्तयावरून वादात सतत अडकणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (manikrao kokate) हे अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका शेतकऱ्यानं त्यांना कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारला, प्रश्न ऐकताच ते चांगलेच संतापले, त्यांनी उलट शेतकऱ्यांनाच सुनावल्याचे पाहायला मिळाले. पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही, कर्जाच्या पैशांमधून लग्न, साखरपुडा करता असं माणिकराव कोकाटे यांनी या शेतकऱ्यांना सुनावलं. याच प्रकरणाचा विडिओ सोशलमिडीयावर वायरल झाला आहे. आधीच सरकारी कोट्यातील फ्लॅट घोटाळ्यामुळे अडचणीत असलेल्या कोकाटे यांच्यावर आता या नव्या वक्तव्यामुळे टीकेची झोड उठली आहे.
 कोकाटे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. तेथे त्यांनी अवकाळीमुळे खराब झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्याने माणिकराव कोकाटे यांना शेतकरी कर्जमाफीबाबत विचारलं. ‘अजितदादा बोलले की कर्जमाफी होणार नाही, रेग्यूलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का?’ असं शेतकरी कोकाटे यांना उद्देशून म्हणाला.

शेतकऱ्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना कोकाटे म्हणाले की, “जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावं. कर्ज घ्यायचं आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचं नाही. समोर मीडिया उभी आहे. त्यामुळे मीडियासमोर मी जास्त बोलत नाही. पण मला एक सांगा, कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
तसेच आता सरकार तुम्हाला म्हणजेच शेतकऱ्यांना शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार शेतकऱ्यांसाठी भांडवली गुंतवणूक करतं आहे. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा,” असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि शेतकऱ्यांत तीव्र नाराजी पाहायला मिळाली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते कि,  शेतकरी कर्जमाफी हा माझा विषय नाही. याबात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, तसेच याच्याअगोदरच  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसून शेतकऱ्यांनी कर्ज भरावं, असं आवाहन देखील त्यांनी केले होते.

मात्र पिकविम्याचा प्रश्न असेल कि, शेतकरी कर्जमाफी किंवा इतर कृषीशी निगडित प्रश्न असतील त्यावर बोलताना किंवा उत्तर देताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे सहजच बोलणे मात्र वादग्रस्त होऊन जाते. कदाचित ते जे बोलले त्यानं बोलण्याचा अर्थ अशाप्रकारे निघेल असे त्यांना वाटले नसेल. परंतु राज्यात कृषिमंत्री कोकाटे यांच्या या शेतकरी विरोधी भूमिकेचा नाव वाक्याचा विरोधकांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोकाटे यांच्यावर जोरदार टीका करत म्हटले, आहे कि, “महाराष्ट्राला भंपक, भामटा आणि बिनडोक कृषीमंत्री मिळाला आहे. हे मंत्री सतत शेतकऱ्यांचा अपमान करत असून, त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली आहे.अशा असंवेदनशील मंत्र्यांना तत्काळ मंत्रिमंडळातून हकालावे.” अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण केली असल्याचे देखील केली असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

तर आमदार एकनाथ खडसे यांनी कोकाटेंच्या वक्तव्याला “निर्लज्जपणाचा कळस” असे म्हणत त्यांचे कान टोचले. त्यांनी शेतकऱ्यांबद्दल अशी भाषा वापरणाऱ्या मंत्र्यावर कारवाईची मागणी केली.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)  गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आपल्या  एक्स म्हणजेच ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे कि, कोकाटे साहेब, कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांना मिळत नाही हे कदाचित आपल्याला ज्ञात नसावे. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही. मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना ब्रम्हज्ञान देण्याची गरजंच नाही.
रोज कोट बदलणाऱ्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याचा फाटलेला सदरा दिसत नसला तरी आपल्या वादग्रस्त संवेदनांचं प्रदर्शन करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं तर अधिक बरं होईल. अशी टीका पवार यांनी केली असून
राजकीयदृष्ट्या थोडक्यात वाचला आहात त्यामुळे जरा जपून…. असा सल्ला देखील त्यांनी कोकाटे याना दिला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानावर जोरदार टीका केली आहे. सपकाळ यांनी म्हटले की, कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पैशांचा वापर “लग्न किंवा साखरपुड्यासाठी” करतात, असे विधान करून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, “शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे म्हणजे सरकार त्यांच्यावर उपकार करते का? हे शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे आहेत, कोकाटेंच्या घरचे नाहीत.”  अशा बेजबाबदार विधानांमुळे कोकाटेंना मंत्रिमंडळातून हाकलून लावले पाहिजे.” अशी मागणी देखील सपकाळ यांनी केली.

विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी कृषिमंत्री यांच्या वक्तयावाचा निषेध करत सरकारला घरचा आहेत दिला आहे. सरकारने अशा शेतकऱ्यांचा वेळोवेळी अवमान करण्याऱ्या मंत्र्याला समाज द्यावी आणि निवडणुकीवेळी कर्जमुक्तीवर भाष्य केले होते, त्याची पूर्तता करावी. तसेच “शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा खर्च कोणीही काढू नये. शेतकऱ्यांबद्दल बोलताना सगळ्यांनी तारतम्य पाळावे. जनतेच्या पैशांवर लग्न करणाऱ्यांवर कोण बोलत नाही, पण शेतकऱ्यांवरच का टीका? शेतकरी हे कष्टाने जगतात, त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही.” त्यांनी पुढे म्हटले की, “कर्जमुक्ती ही शेतकऱ्यांची गरज आहे, त्यांचा हक्क आहे. त्याचा वापर कसा करायचा हे ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांनाच आहे, कोणत्याही मंत्र्याला नाही.”

शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनीही कोकाटे यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार पक्ष कार्यकर्त्यांना शिस्त लावायला सांगतात, परंतु मंत्री मात्र शेतकऱ्यांचा अपमान करत सुटले आहेत. ही शिस्त मंत्रीमंडळात कधी लागू होणार?” असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

अशाप्रकारे कृषिमंत्री असलणाऱ्या माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी हिताचे काही निर्णय घेणे अपेक्षित आहे मात्र तसे होताना दिसत नाही. नेहमीच ते आपल्या कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात. अशा मंत्र्यांना समाज देण्याची मागणी देखील विरोधकांनी केली आहे.  त्यामुळे कार्यकर्त्यांना आणि पुढार्यांना-नेत्यांना समाज देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मंत्र्यांना समाज देणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. कोकाटे यांच्या अशा वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा मालिन तर होताच आहे मात्र एक मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ हा वादातीतच राहतो कि काय अशा प्रश्न देखील यानिमित्ताने सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed