गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा
गुढीपाडवा म्हणजे नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस असून, चला सर्वांना या खास दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन वर्ष गोड-धोड करूया.

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते. गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. या दिवशी ब्रम्हध्वज आणि विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. या दिवसापासून शके १९४६ आणि नव संवत्सर २०८१ प्रारंभ होईल. शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय.
गुडीपाडवा खूप खूप शुभेच्छा.
