24/10/2025

सांगलीचा तिढा सुटला : चंद्रहार पाटील हेच उमेदवार

0

सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने वातावरण तापलं होतं. ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. प्रत्यक्षात इथे काँग्रेसची ताकद आहे.

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आज झाली. या पत्रकार परिषदेलाउद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. पत्रकार परिषदेला सुरुवात करताना जयंत पाटील यांनी मविआच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर माईक संजय राऊत यांच्याकडे सोपवला. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कुठल्या जागांवर लढणार ते वाचून दाखवलं. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस एकूण 17 जागांवर लढणारअसल्याचे त्यांनी सांगितलं.

सांगलीतून उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील उमेदवार असणार आहेत. फक्त आता ग्राऊंड लेव्हलवर त्यांना काँग्रेसकडून कसं सहकार्य मिळतं, त्यावर बरच काही अवलंबून आहे. सांगली जिल्ह्यातून सध्या भाजपाचे संजय काका पाटील खासदार आहेत. मागच्या दोन टर्मपासून तेच खासदार आहेत. मोदींचा पराभूत करण हेच लक्ष्य आहे, असं मविआमधले नेते सांगतायत. पण स्थानिक पातळीवरील या नाराजीचा महायुतीला फायदा होऊ शकतो.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed