Vivo T3x 5G भारतात लॉन्च !

Vivo T3x 5G भारतात लॉन्च
२४ एप्रिलपासून खरेदी करता येणार
विवो ने आज दि. १७ एप्रिल रोजी बुधवारी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Vivo T3x5G लाँच केला आहे. Vivo T3X 5G ची विक्री 24 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

Vivo T3x5G वैशिष्ट्ये :
Vivo T3x5G मध्ये 6000mAh बॅटरी असून Qualcomm चे Snapdragon 6 Gen १ देखील आहे. Vivo T3x 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 91.48% सुपर स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह 6.72-इंच फुल-एचडी+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये धूळ आणि पाणी-प्रतिरोधक वैशिष्ट्ये आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच Vivo T3x 5G मध्ये 50 MP पोर्ट्रेट कॅमेरा आहे.
Vivo T3x5G रंग, cost
सेलेस्टियल ग्रीन आणि क्रिमसन रेड या दोन रंगांमध्ये फोन उपलब्ध असनार आहे. Flipkart वर Vivo T3x5G च्या 4GB + 128 GB मॉडेलची किंमत रु 12,499 आहे. तर दुसरीकडे, 6GB+128 GB मॉडेलची किंमत अनुक्रमे रु 13,499 आणि 8GB +128 GB ची किंमत अनुक्रमे रु.14,९९९ इतकी आहे.