दिनेश कुमार त्रिपाठी यांची “नौदलप्रमुख”पदी नियुक्ती

दिनेश कुमार त्रिपाठी यांची "नौदलप्रमुख"पदी नियुक्ती
नौदलातील व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची भारतीय नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलीय आहे. ते या महिन्याच्या अखेरीस नवीन नौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारनार आहेत. आउटगोइंग नेव्ही चीफ ॲडमिरल आर. हरी कुमार हे सेवानिवृत्त होत आहेत, त्यांच्या जागी श्री. त्रिपाठी यांची निवड करण्यात आली आहे.

ॲडमिरल कुमार 30 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी सध्याचे व्हाईस ॲडमिरल त्रिपाठी यांची नौदलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
त्रिपाठी यांची कारकीर्द
नौदल उपप्रमुख त्रिपाठी यांचा जन्म १५ मे १९६४ रोजी झाला. आणि १ जुलै १९८५ रोजी ते भारतीय नौदलात रुजू झाले. त्रिपाठी, एक संप्रेषण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध विशेषज्ञ म्हणून कार्यरत होते, त्यांची कारकीर्द जवळपास 30 वर्षांची आहे. नौदलाचे उपप्रमुख पद स्वीकारण्यापूर्वी ते वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅट ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते. तर त्यांनी आयएनएस विनाशलाही प्रमुख म्हणून काम केले आहे.
रिअर ॲडमिरल म्हणून ते ईस्टर्न फ्लीटचे कमांडिंग फ्लॅट ऑफिसर, नौदल अकादमी, एझिमालाचे कमांडंट राहिले आहेत. सैनिक स्कूल आणि नॅशनल डिफेन्स अकादमी खडकवासलाचे माजी विद्यार्थी व्हाईस ॲडमिरल त्रिपाठी यांनी नेव्हल वॉर कॉलेज, गोवा आणि नेव्हल वॉर कॉलेज, यूएसए येथेही अभ्यासक्रम केले आहेत. त्यांना अति विशिष्ट सेवा पदक आणि नौदल पदकही मिळाले आहे. एकूणच त्यांची कारकीर्द हि चांगली राहिलेली असून ते नौदल प्रमुख म्हणूनही चांगले काम करतील.