सोने ७५००० तर चांदी ८४००० पार !

सोने ७५००० तर चांदी ८४००० पार
GOLD RATE – इराण आणि इस्रायल संघर्षाचा परिणाम हा सोन्यावर झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आजचा सोन्याचा दर हा रु. ७५ हजार तर चांदीचा दर रु. ८३ ते ८४ हजार इतका वाढलेला पाहायला मिळत आहे.

24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह 75,500 रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. तर 22 कॅरेटचा दर 67 हजारहून अधिक रुपयांवर पोहचला आहे.

चांदीचे दर 83 हजार रुपये किलो एवढा आहे. सोन्या – चांदीचे दर गगनाला भिडल्याने येत्या अक्षय तृतीयेला हे दर जास्तच वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान या महागाईमुळे सराफ बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.