हवामान विभाग : राज्यात अवकाळी पाऊस

राज्यात अवकाळी पाऊसाची शक्यता
हाय अलर्ट जारी
maharashtra rain – राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका हा मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांना बसला आहे, फळबागा, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा एकदा अवकाळीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शासनाकडून हायअलर्ट देण्यात आला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. मात्र अजूनही अवकाळी पावसाचं संकट टळलेलं नाही, त्यात तापमान देखील वाढत आहे. आज ३९ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. तर अनेक ठिकाणी ४० थे ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटाह पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात हलक्याशा सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान नुसताच पाऊस पडणार नसून, या काळात सोसाट्याचा वारा देखील वाहणार आहे. वाऱ्याचा वेग प्रतितास 30-40 किमी इतका असू शकतो असा अदांज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.

दरम्यान दुसरीकडे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती असण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही उष्णता वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील उष्णतेची लाट आहे.

राज्यात सध्या निसर्गाचा लपंडाव सुरु असून काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी तापमान वाढलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासनाने या भागात हाय अलर्ट जरी केला आहे.