भुजबळ यांची नाशिकमधून माघार !

भुजबळ यांची नाशिकमधून माघार
गोडसेंचा मार्ग मोकळा
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. मात्र उमेदवारी जाहीर न झाल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपण माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे (शिंदे गट) हेमंत गोडसे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. भुजबळ याना येथून मराठा संघटनांचा विरोध देखील होता .

दिल्लीत अमित शहांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली होती, त्यावेळी आपल्या नावावर अमित शहांनीच शिक्कामोर्तब केलं होतं, पण उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशिर झाल्याचंही भुजबळ म्हणाले. दोन दिवसांपूर्वीच नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये भुजबळ आणि गोडसे यांची भेट झाली होती, त्यावेळी गोडसे यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले होते.
नाशिकचा तिढा सुटलेला दिसत नाही. जेवढा उशिर होईल तेवढं नाशिकच्या जागेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ताबोडतोब निर्णय घेणं गरजेचं आहे. कोण जागा लढवणार, कोण उमेदवार हे जाहीर करायला हवं. अन्यथा अडचण निर्माण होईल. प्रतिस्पर्धी कामाला लागले आहेत. संदिग्धता असल्याने ही संदिग्धता आपण दूर करायला हवी, असे भुजबळ यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेही मंत्री छगन भुजबळ यांना पवार यांनी उमेदवारी दिली असती तरी त्यांचे निवडून येण्याची संधी कमीच होती, कारण मराठा आरक्षण विरोध होय.