पीएम किसान योजनेचा हप्ता मे महिन्यात होणार जमा

पीएम किसान योजनेचा हप्ता मे महिन्यात होणार जमा
योजनेचा अर्ज कसा करावा जाणून घ्या सर्व माहिती
PM KISAN YOJANA – PM किसान योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये केली होती. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रु. दिले जातात. आता या पीएम-किसान योजनेचा 17 वा हप्ता मे महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना होत आहे, मात्र अनेक शेतकरी अद्याप देखील काही कारणास्तव लाभ होत नाही, ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी योजनेची माहिती घेऊन खाली दिल्याप्रमाणे प्रोसेस करावी.

योजनेसाठी असा करा अर्ज
१) pmkisan.gov.in या साईटवर जाऊन योजनेचा लाभ घेता येईल
२) ‘किसान कॉर्नर’ पर्यायावर क्लिक करा
३) ‘न्यू किसान रजिस्ट्रेशन’ हा पर्याय निवडा
४) तुमचे शहर अथवा गावाची निवड करा
५) आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, आणि राज्याची निवड करा
६) ‘गेट ओटीपी’ वर क्लिक करा
७) ओटीपी नोंदवून नोंदणीची पुढील प्रक्रिया करा
८) नाव, राज्य, जिल्हा, बँक आणि आधारचा तपशील अशी सर्व माहिती भरा
९) आधार प्रामाणिकरण करुन अर्ज जमा करा
१०) शेतीसंबंधीची माहिती जमा करा
११) सेव्ह बटणावर क्लिक करा
१२) नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मॅसेज येईल
हि कामे त्वरित करा
१) आधार क्रमांकासह बँक खाते नोंदणी झाले की नाही ते तपासा
२) बँक खाते NPCI सोबत संलग्न असणे आवश्यक
३) केवायसी तपशील पूर्ण करणे आवश्यक आहे
४) भू-सत्यापन, तुमच्या शेतीविषयक दस्तवेजांचे सत्यापन आवश्यक आहे
५) तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते पण तपासा
पैशांचे स्टेटस असे करा चेक
१) सर्वात अगोदर पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in’ वर जा.
२) या ठिकाणी ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.
३) या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.
४) आता खालील कॅप्चा कोड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
५) त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा.
काही प्रॉब्लेम असेल तर या क्रमांकावर करा कॉल
१) पीएक किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
२) पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401
३) पीएम किसान हेल्पलाईन : 155261, 18001155266
४) पीएम किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक : 011-24300606
५) 14व्या हप्त्याबाबत अडचण असल्यास : 011-24300606